काय आहे मिशन अग्निपथ?, का करत आहेत लाखो विद्यार्थी आंदोलन?

नवी दिल्ली – Mission Agnipath Army Recruiment | मंगळवारी १४ जूनला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी सैन्यभरती बाबत ‘मिशन अग्निपथ’ (Mission Agnipath) नावाची ऐतिहासिक घोषणा केली. कॅबिनेट मध्ये या योजनेचा ठराव झाल्यानंतर राजनाथ सिंग यांनी माध्यमांसमोर याबाबत घोषणा केली. देशाची सुरक्षा आणखी (Indian Defence) मजबूत करण्यासाठी आणि मोठ्या संख्येने तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळावी यासाठी हा पुढाकार घेण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर या योजनेमुळे भारतीय सैन्यदलाची प्रतिमा अधिक तरुण होण्यासाठी मदत होणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

काय आहे ‘मिशन अग्निपथ’? (What Is Mission Agnipath)

  • मिशन अग्निपथ ही सशस्त्र दलात अधिकारी पदाच्या खालील पदांसाठी सामील होऊ इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांसाठी भरती योजना आहे.
  • या योजनेनुसार सैन्यात भरती झालेल्या चार वर्षांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरीवर घेण्यात येईल.
  • मिशन अग्निपथ योजनेतून भर्ती झालेल्या सैनिकाला ‘अग्निवीर’ म्हटले जाईल.
  • प्रत्येक वर्षी देशभरातून ४६ हजार जागांसाठी भरती होणार होईल, तर चार वर्षांनतर त्यांपैकी काही प्रमाणात सैनिक कायमस्वरूपी करण्यात येतील आणि इतरांना सेवानिवृत्त करण्यात येईल.
  • सेवानिवृत्त सैनिकांना एकाचवेळी ‘सेवा निधी’ देण्यात येईल, ज्याची रक्कम ११.७१ लाख आणि व्याज एवढी असेल. आणि ती रक्कम पूर्णतः करमुक्त असेल.
  • योजनेअंतर्गत 17.5 ते 21 वयोगटातील पुरुष आणि महिला दोघांनाही सशस्त्र दलात भरती होता येणार आहे. त्यामध्ये महिलांसाठी कसलेही वेगळे आरक्षण असणार नाही. ‘All India-All Class’या तत्वावर नवीन तरुणांना भर्ती केले जाईल.

यामध्ये अग्निविरांना पहिल्या वर्षी ४.७६ लाख रुपयांच्या पगारापासून सुरुवात होणार असून चौथ्या वर्षापर्यंत तो पगार ६.९२ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यानंतर निवृत्त होताना प्रत्येक अग्निविरांना ‘सेवा निधी’ म्हणून ११.७१ लाख रुपये मिळणार आहेत.
सेवानिवृत्तीनंतर अग्निविरांना प्रमाणपत्र दिले जातील ज्याचा फायदा पुढील करिअर साठी आणि बँकेतील सुविधांसाठी होईल.
२०२२ च्या ऑक्टोबर महिन्यापासून मोशन अग्निपथ योजनेतून सशस्त्र दलात भर्ती प्रक्रिया सुरु होणार आहेत.

या योजनेचे फायदे काय ?

मिशन अग्निपथ योजनेचे एकीकडे कौतुक केलं जात आहे कारण, या योजनेमुळे अनेक तरुणांना देशसेवा करण्याची संधी मिळणार असून अनेकांचा नोकरीचा प्रश्न सुटण्यास मद्दत होणार आहे. नोकरीवरून निवृत्त झाल्यानंतर देखील अग्निविरांना इतर सरकारी नोकरीसाठी फायदा करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर चार वर्षांच्या नोकरीनंतर ११.७१ लाख रुपयांचा निधी देखील मिळणार आहे. त्याचबरोबर विमा देखील मिळणार आहे.

योजनेला विरोध का होत आहे?

वरील सर्व सुविधा असताना नोकरीचा काळ फक्त चार वर्षे नको यासठी तरुण मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार पूर्वीची भरती पद्धतच ठीक होती. या नवीन पद्धतीमुळे त्यांना जास्त दिवस नोकरी करता येणार नाही त्याचबरोबर; निवृत्तीनंतर पेंशन देखील मिळणार नाही. यासाठी भरतीची तयारी करत असणाऱ्या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे.

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत. पूर्वीची भरती प्रक्रिया परत नाही आणली गेली तर आम्ही आत्महत्या करू अशा चेतावणी विद्यार्थ्यांकडून दिल्या जात आहेत. आम्ही एकेक दोन दोन वर्षे भरतीची तयारी करून सरकार आम्हाला फक्त चार वर्ष नोकरीची संधी देणार आहे, हा आमच्यावर अन्याय असल्याचं विद्यार्थी म्हणत आहेत.

Dnyaneshwar: