गव्हाचे पीठ लवकरच होणार स्वस्त! केंद्र सरकारचा निर्यातीसंबंधित मोठा निर्णय

नवी दिल्ली : जगभरात गव्हाची मोठ्या प्रमाणात निर्यात करणारे युक्रेन आणि रशिया हे देश आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून या दोन राष्ट्रांत युध्द सुरु असल्याने तेथील गव्हाची निर्यात संथ झाली आहे. त्यामुळे जगभरातून भारतीय गव्हाला मागणी वाढली आहे. परिणामी, भारतीय गहू मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने देशात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. वाढलेल्या किमतींमुळे देशातील जनता त्रासून गेली आहे. मात्र, आता यावर केंद्र सरकारने नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.

गव्हाच्या पिठाच्या किमतींना आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत गहू आणि मेसलीन पीठासाठी निर्यातबंदी वगळणाऱ्या धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच गव्हाच्या पिठाच्या किमती आटोक्यात येण्याच्या शक्यता आहेत.

Dnyaneshwar: