मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे यावरून राजकारण सुरू आहे. यादरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी भाजप सत्तेत होते त्या दिवसांचा दाखला देत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत मविआ सरकारवर निशाणा साधला आहे, त्यांनी, “भाजप सत्तेत असताना बुलेट ट्रेन, हायपर लूप, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार etc अशा गोष्टीवर चर्चा असायच्या..! , पण आता महाराष्ट्रात चर्चा असते ती देशमुख, मलिक कांड, खंडणी, हाणामारी, घरकोंबडा, पेपर घोटाळा, आरक्षणाचा बट्याबोळ अशा विषयावर असते..!, फरक समजून घ्या..!” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.