मुंबई | Salman Khan – बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटानं बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे. चित्रपटासोबतच सलमान त्याच्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत असतो. आताही पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे, कारण त्याला एका चाहतीनं लग्नाची मागणी घातली आहे. यावर त्यानं देखील भन्नाट उत्तर दिलं आहे.
सलमान खानचं आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं आहे. पण तरीही सलमाननं अजूनही लग्न केलेलं नाहीये. त्यामुळे त्याला बहुतेक मुलाखतींमध्ये त्याच्या लग्नाबाबत विचारलं जातंच. आताही सलमानला एका इव्हेंटदरम्यान लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर त्यानं त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
आयफा पुरस्कार सोहळ्याला सलमाननं हजेरी लावली होती. यावेळी एका इव्हेंटदरम्यान पत्रकारांशी गप्पा मारताना सलमानला एका महिलेनं थेट लग्नाची मागणी घातली. सलमान तू माझ्याशी लग्न करशील का? असं तिनं विचारलं. यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, “माझ्यासाठी आता लग्न करण्याचे दिवस संपल्यात जमा आहेत. मला तू 20 वर्षांपूर्वीच भेटायला हवी होतीस.” सध्या सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.