पुणे : आज महाराष्ट्रात एका बाजूला महागाई आणि दुसऱ्याबाजूला भोंग्यांचं राजकारण यामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप विरोधात आंदोलन केलं आहे. तसंच भोंग्याच राजकारण करून भाजप महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केट असल्याचा आरोपही पुणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
याचप्रमाणे त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे ही उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारला सुबुद्धी येऊ दे, नको त्या विषयांना महत्व देऊन केंद्र सरकार झोपायचं सोंग घेत आहे. त्याला जागं करण्याचं काम आम्ही करत आहे. महागाईचा भडका उडला असूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महागाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सिलेंडर मोफत दिला. पण तो पुन्हा महिलांना भरता आला नाही. पंतप्रधानांवर विश्वास ठेवला.पण सामान्य माणसांवर कोणीही लक्ष दिलं नाही.
दरम्यान,सुप्रिया सुळेयांनी जब भूक लगती है, तब धान लगता है ,हे सुष्मा ताईंचं भाषण आठवलं असल्याचं त्यांनी सांगितं थेट सरकारला प्रश्न विचारला आहे. 20१३ मध्ये महागाई सुरू असताना आता चार पट महागाई झाली आहे.असं त्या म्हणाल्या.