मुंबई : एकनाथ शिंंदे यांच्या बंडामुळं राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे सध्या एखाद्या घाटातल्या वळणापेक्षाही जास्त वळणं घेत आहे. ते नेमकं कोणत्या दिशेला वळण घेईल हे भल्याभल्या जाणत्या राजकारण्यांना संभ्रमात पडायला लावणारे नाही.
दरम्यान, गुरुवार दि. २३ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदेना भाजपचा पाठिंबा आहे का? या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामागे भाजपचा एखादा मोठा नेता अद्याप तरी दिसून येत नसल्याचे विधान काल केले होते.
त्यावर अजित पवारांना राज्यातील स्थिती माहिती आहे. परंतु, आसाम आणि गुवाहटी येथील स्थिती माहिती नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवार दि. २३ रोजी पत्रकार परिषदेत केले होते. दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची माझी लायकी नाही असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आम्ही सरकार टिकवण्यासाठी सर्वोतोरी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यांच्या पाठीशी आम्ही कायम उभे आहोत. उद्धव ठाकरे यांचं सध्याच्या परिस्थितीवर काय म्हणणे आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत. जयंत पाटील आणि आम्ही त्यांची भेट घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.