एकनाथ शिंदे हॉटेलबाहेर पडून गेले कुठे? कोणाला भेटणार!

मुंबई : (Eknath Shinde Remove On Guwahati Hotel) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राचं राजकारण हे सध्या एखाद्या घाटातल्या वळणापेक्षाही जास्त वळणं घेत आहे. ते नेमकं कोणत्या दिशेला वळण घेईल हे भल्याभल्या जाणत्या राजकारण्यांना संभ्रमात पाडायला लावणारे नाही. शिवसेनेचे बंडखोर नेते गुवाहाटीतल्या हॉटेलमधून शिंदे यांच्या ट्विटवरुन ट्विट करत आहेत. ट्विटवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आहेत.

मात्र, आज बंडखोर नेते शिंदे हे दोन-तीन दिवसानंतर प्रथम गुवाहाटी येथिल हाॅटेलच्या बाहेर पडले आहेत. ते बाहेर कुठे गेले आणि कोणाला भेटायला गेले हे पाहणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. भेटून आल्यावर काय निर्णय घेतात हे देखील महत्त्वाचे आहे. अशातच आता आमदार शहाजी पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आहे. एकीकडं शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीला भाजपचं पाठबळ आहे, हे एक उघड गुपित असलं तरी याबाबत भाजप समोर येत नाही.

शिंदे यांनी देखील आपणाला राष्ट्रीय पक्षाचं पाठबळ असल्याचं मान्य केलं आहे. त्यातच आता या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये या बंडखोर आमदारांनी केलेल्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये काही आधीच ठरलं आहे का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांची आज सायंकाळी बैठक होणार आहे. त्याआधी शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते कशासाठी रवाना झाले आहेत आणि कुणाला भेटणार आहेत याची माहिती समोर आली नाही.

Prakash Harale: