राजीव गांधींच्या निधनाची बातमी सांगायच्या वेळी प्रदीप भिडेंना..

मुंबई –  मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असं म्हणत चार दशकं बातम्या देणारे प्रदीप भिडे यांचं निधन झालं आहे. भिडे यांनी 1974 ते अगदी 2016 पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं होतं. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती त्यावेळी प्रदीप भिडेंनी याबाबतचे वृत्त दिले होते.

राजीव गांधी यांची 21 मे 1991 ला श्रीपेरंबुदूर येथे हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना तत्कालीन वृत्तसंपादिका विजय जोशी यांनी त्यांना असशील तसा निघून ये असं सांगितलं होतं. राजीव गांधी यांच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.

प्रदीप भिडे यांना पोलिसांच्या जीपमध्ये केंद्रात आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी कोणताही अभिनिवेश न आणता बातमी दिली होती. भिडे सर निवेदन करत होते तेव्हा महाराष्ट्रात दुसरं कोणतंही चॅनेल नव्हतं. फक्त दूरदर्शन होतं, असं  प्रसिद्ध वृत्तनिवेदक श्रीराम केळकर यांनी सांगितलं.

RashtraSanchar: