मुंबई | Sarsenapati Hambirrao Movie | दिग्दर्शक (Director), लेखक (Writer) आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे (Actor Pravin Tarade) यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या चित्रपटानं बॅाक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अॅक्शनमुळे सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक करताना दिसत आहे. तसंच नुकतंच विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांनी हा चित्रपट पाहिला असून त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. “पद्मश्री मा. श्री. उज्ज्वल निकम- विशेष सरकारी वकील भारत सरकार यांनी महाराष्ट्राचा महासिनेमा पाहिल्यानंतर दिली प्रतिक्रिया,” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
“हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेकरिता ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सर्व थोर महान योद्धांचे आज पुन्हा एकदा स्मरण. हंबीरराव मोहिते सरसेनापती यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने निश्चित होते. खरोखर या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्राण ओतून काम केले आहे. मला हा चित्रपट बघताना असं वाटत होतं की आपण त्या पूर्वीच्या काळात गेलो आहे. जय भवानी जय शिवाजी. शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) आठवण येते. या चित्रपटाच्या निर्मात्यांना कलाकारांना आणि दिग्दर्शकांना खूप खूप धन्यवाद,” असं अॅड उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.