‘बिग बॉस मराठी 4’चा महाविजेता कोण होणार? दावेदार तर सगळेच, पण विनर एकच…

मुंबई : (Who will be the grand winner of ‘Bigg Boss Marathi 4‘) ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi)म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचते. मग पर्व कधी सुरु होणार? सदस्य कोण असणार? सिझनच घर कसं असेल? आणि बरंच काही… आता संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत आहे ते म्हणजे या पर्वाचा महाविजेता कोण ठरणार याची. अखेर तो क्षण आला आहे. 100 दिवसांपूर्वी 16 सदस्यांसोबत या रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली आणि आता घरात उरले आहेत टॉप पाच (Top 5) सदस्य. यात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अक्षय केळकर (Akshay Kelkar), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), किरण माने (Kiran Mane) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) या (Bigg Boss Marathi Season 4 Finalists) स्पर्धकांचा समावेश आहे.

बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील सदस्य अगणिक टास्क आणि अडचणींना सामोरे गेले. कधी कधी घरच्यांच्या आठवणीने डोळे पाणावले तर कधी सदस्य घराबाहेर गेला ही गोष्ट मनाला चटका लावून गेली. हे घर अशा अनेक क्षणांचे साक्षिदार राहिले आहे. आता हेच घर निरोप घेण्याच्या वाटेवर आहे. कारण, आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार असला तरीदेखील हे नातं मात्र अधिक दृढ झाले आहे यात शंका नाही.

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्वदेखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. आता या टॉप पाच स्पर्धकांमधून कोणता सदस्य ठरणार ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. येत्या रविवारी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथाचा पर्वाचा महाअंतिम सोहळा 8 जानेवारी रोजी संध्या 7.00 वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Prakash Harale: