“मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार हे कोणीच सांगू शकत नाही, कारण…

Eknath Shinde And Devendra Fadnavis 5Eknath Shinde And Devendra Fadnavis 5

औरंगााबद : (Who will get a place in the cabinet Haribhau Bagde) राज्यात मोठ्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजप व बंडखोर शिंदे गटातील अनेक आमदारांना आपल्याला मंत्रीपद मिळणार की नाही याची चिंता लागलेली दिसत आहे. तर कोणाला कोणतं खातं मिळतं याकडं सर्वाचं आमदारांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भाजप आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार हे कुणालाच सांगता येणार नाही. ते फक्त देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. त्यामुळे त्यांनाच विचारायला हवं. प्रत्येकजण मंत्रीपदासाठी इच्छूक आहे. कोण फार उत्सूक आहे असं मी नाव सांगणार नाही. ज्याची त्याची इच्छा असते.

पुढे बोलताना ते म्हणाले, एक गोष्ट निश्चित केली पाहिजे. ती गोष्ट आमच्या सर्व आमदारांना माहिती आहे. पक्षाने संधी दिली तर काम करायचं, संधी दिली नाही तर आपलं पक्षाचं काम करत राहायचं. आपण पक्षापेक्षा मोठे नाही ही भूमिका आमच्या मनात कायम आहे, असंही हरिभाऊ बागडे यांनी नमूद केलं.

Prakash Harale:
whatsapp
line