शिवसेना कोणाची?, २७ तारखेच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष!

नवी दिल्ली : (Whose Shiv Sena? Thackeray Or Shinde)एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी करत सेनेला मोठं भगदाड पाडलं. त्यानंतर शिवसेना कोणाची? हा वाद सर्चोच्च न्यायालयात गेला. मागील तीन महिन्यापासून न्यायालयाकडून या निर्णयावर ‘फक्त तारीख पे तारीख’ दिली जात आहे. दसरा मेळावा मैदानाच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दि.23 रोजी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली होती. तर उद्धव ठाकरेंना या मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात 27 सप्टेंबरला होणार आहे. महाराष्ट्राचं प्रकरण कोर्टात कामकाजात समावेश केला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. 27 तारखेला सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचे प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, मंगळवारी तरी निकाल लागणार की, पुन्हा तारीख पे तारीख दिली जाणार हे पहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.

मात्र, निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही याबाबत सुरुवातीला निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते. त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होतं हे पहाण्यासाठी संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Prakash Harale: