नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली? मनसे नेत्याचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून ते…”

मुंबई | Nitin Desai Suicide – आज सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. तसंच पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशातच आता मनसे नेत्यानं नितीन देसाईंबाबत मोठा खुलासा केला आहे.

नितीन देसाई यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान मनसेचे रायगड अध्यक्ष जितेंद्र पाटील मोठा दावा केला आहे. ते टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलत होते. जितेंद्र पाटील यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून नितीन देसाई हे अस्वस्थ होते. ते अनेक बाबींवर माझ्यासोबत चर्चा करायचे. मग आर्थिक अडचणी असो अशा अनेक गोष्टींवर चर्चा करायचे. तसंच कला क्षेत्रातील काही नामांकित व्यक्तींकडून देसाईंच्या एन.डी.स्टुडिओला शूटिंग येऊ दिल्या जात नव्हत्या. याबाबत ते माझ्याशी बोलायचे. या गोष्टी खूपच क्लेशदायक आहेत.

दरम्यान, जितेंद्र पाटील यांनी केलेल्या या खुलाशानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसंच नितीन देसाईंवर तब्बल 249 कोटींचं कर्ज असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे देसाईंनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येतीये.

admin: