मुंबई | Priyanka Chopra – बाॅलिवूडची ‘देसी गर्ल’ (Desi Girl) प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. तिनं तिच्या अभिनयाची छाप बाॅलिवूडसोबत (Bollywood) हाॅलिवूडमध्येही पाडली आहे. तिचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. तसंच तिनं हाॅलिवूडमध्ये (Hollywood) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच प्रियांकानं एका मुलाखतीत बाॅलिवूड सोडून ती हाॅलिवूडमध्ये का गेली? याबाबत खुलासा केला आहे.
प्रियांकाची ‘सिटाडेल’ (Citadel) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या प्रियांका या वेबसीरिजचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या सीरिजच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत तिनं बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जातानाचे काही अनुभव शेअर केले आहेत.
यावेळी प्रियांका म्हणाली की, “बाॅलिवूडमध्ये मी खूप चांगलं काम केलं. तरीही मला वाळीत टाकलं जात होतं. मला त्यावेळी काम मिळत नव्हतं. मला बाॅलिवूडमधील राजकारणाचा कंटाळा आला होता. त्यामुळे मी काही काळ ब्रेक घेतला होता. नंतर मी अनेक हाॅलिवूड चित्रपट पाहिले आणि हाॅलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.”
पुढे प्रियांकानं हॉलिवूडमध्ये काम कसं मिळालं याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “माझा एक व्हिडीओ देसी हिट्सच्या अंजुला आचार्य यांनी पाहिला होता. त्यांना माझं काम आवडलं आणि त्यांनी मला हॉलिवूड चित्रपटासाठी विचारणा केली. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांसाठी विचारणा होत नसल्यानं मी लगेचच अंजुला यांना होकार दिला”.
दरम्यान, सध्या प्रियांका ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिची ही वेबसीरिजची हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसंच 28 एप्रिलपासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही सीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात.