पत्नीनं रचला पतीच्या हत्येचा कट; धक्कादायक व्हिडीओ होतोय व्हायरल, कॉफीमध्ये ब्लीच मिसळलं अन्…

Crime News | पती-पत्नीमध्ये भांडणं नेहमी होत राहतात. पण काही वेळा हीच भांडणं टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडतात. त्यामुळे या भांडणांमध्ये पतीनं पत्नीची हत्या केल्याच्या किंवा पत्नीनं पतीची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील (America) अॅरिझोनामध्ये पत्नीनं पतीच्या हत्येचा कट रचला होता.

अॅरिझोनामध्ये राहणाऱ्या एका जोडप्याची घटस्फोटाची केस कोर्टात सुरू होती. तसंच या जोडप्यामध्ये सारखे वाद होत होते. या वादाला कंटाळून पत्नीनं पतीच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, पतीच्या हुशारीमुळे हा कट उघडकीस पडला.

मेलोडी फेलिकानो (39) असं आरोपी महिलेचं नाव आहे. तर रॉबी जॉन्सन हे तिच्या पतीचं नाव आहे. रॉबी जॉन्सन हा एअरफोर्समध्ये काम करतो, त्यामुळे तो बऱ्याचदी जर्मनी आणि अॅरिझोनामध्ये ड्युटीवर तैनात असायचा. यादरम्यान त्याची पत्नी मेलोडीनं त्याच्या हत्येचा कट रचला होता. मेलोडी पती रॉबीच्या कॉफीमध्ये ब्लीच मिसळून त्याला मारण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, रॉबी सावध आणि हुशार निघाला. त्यानं किचनमध्ये गुप्त कॅमेरा बसवला होता, त्यामुळे पत्नीचा हत्येचा कट कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मार्च 2023 मध्ये रॉबीला जर्मनीत पोस्टींग मिळाली होती. तेव्हापासून मेलोडी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिसळत होती. मेलोडीनं पती रॉबीला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. तर हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोपी मेलोडीला अटक करण्यात आली आहे.

Sumitra nalawade: