मुंबई : (Wikipedia’s big mistake) सर्व सामान्य जनता ज्या गुगल सर्व इंजिनवर डोळेझाकून विश्वास ठेवतात, ते गुगल आपल्याला एवढी अचूक माहिती देते का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्याचे कारण म्हणजे राजकारणातील विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सत्ताधारी आणि विरोधकांवर रोज काही तरी बोलायला निमित्त शोधत असतात.
दरम्यान, गुगल सर्च इंजिनमध्ये विकिपिडियावर शिंदे गटाच्या चार मंत्र्याना भाजपमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधान आले असून विरोधकांना यामुळे आयते कोलीत मिळाले आहे. दोन दिवसांपुर्वी राज्यातील रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार पार पडला आहे. मात्र, अद्याप खाते वाटप झाले नसून संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये भाजपचा वरचष्मा दिसून येत आहे.
यानिमित्ताने विरोधक शिंदे गटावर तोंडसुख घेताना दिसत आहेत. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे, विकिपिडियाने शिंदे गटातील चार मंत्र्यांना भाजपमध्ये दाखवण्यात आले आहे. भाजपमध्ये दाखवलेले शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे, उदय सामंत, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांच्या नावापुढे भारतीय जनता पार्टी असे दाखवण्यात येत आहे. याप्रकारचा खोडसाळपणा कुणी केला असाही संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. हा नेमका काय प्रकार आहे अद्यार समोर आले नाही.