मुंबई | Bigg Boss 17 : सध्या ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) हे पर्व चांगलंच चर्चेत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरातील पहिला विकेंडचा वार पार पडला आहे. यावेळी सलमान खाननं (Salman Khan) घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेतलेला दिसत आहे. तर यंदाच्या पर्वात अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली आहे. यामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) हे देखील सहभागी झाले आहेत.
तर नुकताच अंकिता आणि विकीचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरून अंकिता आणि विकी एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बिग बॉसचं घर म्हटलं की स्पर्धकांमध्ये वाद हा आलाच. तर आता बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकीमध्ये बिनसल्याचं दिसत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता विकीला म्हणते की, मला असं वाटलं होत की तू माझी ताकद आहेस पण तू नाहीस. त्यावेळी विकी थेट उत्तर देतो की, मी दिवसभर तुझ्या मागेच फिरायचं का? मी हे करू शकत नाही.
मी इथे माझं नाक कट करायला आलो नाहीये. तू मान्य कर की एक अत्यंत वाईट काळ आपल्यामध्ये आला होता, असं विकीने म्हणताच अंकिता म्हणते की, तू नेहमी तो विषय का काढतोस? सध्या अंकिता आणि विकीच्या या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या व्हिडीओवरून बिग बॉसनंतर अंकिता आणि विकी एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CyusS_7v3U2/?utm_source=ig_web_copy_link