मुंबई | Abdul Sattar – भाजप-शिंदे गट (BJP-Shinde Group) आणि मनसे (MNS) यांच्यात राजकीय जवळीक वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यात युती होण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. यापार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मनसे महायुतीत सहभागी होणार का? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते आज (16 डिसेंबर) टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
“मनसेनं कोणाबरोबर जायचं हे राज ठाकरे (Raj Thackeray) ठरवतील. राज ठाकरे हे राज्यातील प्रमुख पुढाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. आमच्याबरोबर राज ठाकरे आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांना आमच्या सर्वच नेत्यांनी आमच्याबरोबर येण्याचं आव्हान केलं आहे. परंतु शेवटी निर्णय राज ठाकरेंचा आहे. ते काय निर्णय घेणार हे इतर कोणालाही सांगता येणार नाही,” असं मत अब्दुल सत्तारांनी व्यक्त केलं.
पुढे महाविकास आघाडीच्या महामोर्चावर (Mahavikas Aaghadi Mahamorcha) बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “महामोर्चात कितीही लोक आले तरी सरकार त्याला घाबरत नाही. कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये इतकी दक्षता ठेवावी. शेवटी मोर्चा काढण्याचे काही नियम आणि धोरणं आहेत. त्यांनी त्याचं पालन करावं आणि मोर्चा काढावा.”