मुंबई : (Sharad Pawar meeting On Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
दरम्यान, राज्यात घडामोडींना वेग आला आहे या पार्श्वभुमीवर शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हे देखील वर्षावर बंगल्यावर दाखल झाले आहेत. या बैठकीत पवार आणि ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर समजणार आहे की, सरकार जाणार का? वाजणार हे बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
आडीच वर्षापुर्वी अजित पवार यांनी बंड केल्यामुळं सरकार स्थापनेवर गडांतर आलं होतं, त्यावेळी ते वाचवण्यासाठी शरद पवारांनी मध्यस्थी करत हे मविआ सरकार सरकार स्थापन केलं. त्यामुळं याहीवेळी शरद पवार संकटमोचक ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे