नवी दिल्ली | Nirmala Sitharaman On Budget 2023 – येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहेत. त्यामुळे आता महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला यंदाच्या अर्थसंकल्पात दिलासा मिळाणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुचक विधान केलं आहे. मी स्वत: मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे मध्यमवर्गीयांना होणाऱ्या त्रासाची मला कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’ या मासिकेला दिलेल्या मुलाखती दरम्यान बोलत होत्या.
यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “मी स्वत: मध्यमवर्गीय असून मध्यमवर्गींना होणाऱ्या त्रासाची मला कल्पना आहे. आम्ही गेल्या काही वर्षात मध्यमवर्गीयांवर कोणतेही नवीन कर लादलेले नाहीत. टॅक्स स्लॅबमध्ये देखील बदल करण्यात आले नाहीत. 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णत: करमुक्त आहे. देशातील 27 शहरांमध्ये आम्ही मेट्रो रेल्वे नेटवर्क विकसीत केले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना त्याचा मोठा फायदा होत आहे.
ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतर होत आहे. त्यामुळे आम्ही 100 स्मार्ट सिटी निर्माण करत आहोत. यासाठी निधी देखील देण्यात आला आहे. देशातील मध्यमवर्गीय जनतेसाठी जे काही करत येईल, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे”, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
दरम्यान, निर्मला सीतारामण येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे पाचवे बजेट आहे. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात 66 दिवसांमध्ये एकूण 27 बैठका होतील. 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत अवकाश घेतला जाणार आहे. तर संसदेचा दुसरा टप्पा 12 मार्चपासून सुरू होणार आहे.