ट्विटर वापरासाठी वापरकर्त्यांना मोजावे लागणार पैसे ? इलॉन मस्क यांचे स्पष्टीकरण

जगभर प्रसिद्ध असलेली मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली आहे. थोड्याच दिवसांत हा खरेदी करार पूर्ण होऊन इलॉन मस्क यांचे ट्विटर वरती संपूर्ण नियंत्रण असेल. आणि आता ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. त्यामुळे ट्विटरची सेवा मोफत असेल कि त्यासाठी वापरकर्त्यांना वेगळे पैसे मोजावे लागतील, असा प्रश्न पडला आहे. त्याबाबत आता इलॉन मस्क यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

इलॉन मस्क यांनी ट्वीट करून सांगितलं आहे की, “ट्विटर नेहमी सामान्य युजर्ससाठी विनामूल्य असेल, परंतु व्यावसायिक/सरकारी युजर्संना थोडासा खर्च होऊ शकतो.”

मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना सांगितले की कंपनीच्या व्यवस्थापनावर त्यांचा अजिबात विश्वास नाही. सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशन मध्येही मस्क यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक डॉर्सीच्या जागी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अग्रवाल यांना १२ महिन्यांआधीच काढून टाकले तर कंपनीला त्यांना ३८.७ अब्ज डॉलर (सुमारे २९६ कोटी रुपये) द्यावे लागतील. मात्र, कराराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पराग अग्रवाल या पदावर राहतील.

Nilam: