मुंबई | Viral Video – काही वर्षांपूर्वी नागिन डान्स चांगलाच प्रसिद्ध झाला होता. हे गाणं आजही ऐकलं तरी प्रत्येकजण त्याच्यावर ठेका धरतंच. मग कुणी जमिनीवर लोळून नाचतात तर कुणी अंगात नाग घुसल्यासारखं नाचतात. हे गाणं जुनं झालं असलं तरी या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. त्यातच आता नागिन डान्सनंतर ‘दारू डान्स’ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका पठ्ठ्यानं चक्क दारू डान्स केला असून त्याच्या या अफलातून डान्सला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरूण अतरंगी डान्स करताना दिसत आहे. हा तरूण नाचताना दारू पिण्याची अॅक्टिंग करताना दिसत आहे. दारूच्या बाटलीचे झाकण उघडणे, पेग भरणे, पेग मारणे आणि चकणा खाण्याची अॅक्टिंग हा तरूण करताना करत आहे. त्यानं केलेली ही अॅक्टिंग आणि डान्स जबरदस्त असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, सोशल मीडिया हे मनोरंजनाचं साधन आहे. यावर अनेक व्हिडीओ, पोस्ट व्हायरल होत असतात. तसंच आता देखील या तरूणाचा दारू डान्स सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या तरूणाच्या दारू डान्सवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स देखील दिल्या आहेत. तसंच त्याचा हा व्हिडीओ खूप जणांनी शेअरही केला आहे.