नागपूर : (Winter Session Live Nagpur Maharashtra) “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी NIT चा ८३ कोटी रुपयांचा प्लॉट फक्त २ कोटी रुपयांना विकला आहे. यात भ्रष्टाचार झाला आहे. वरच्या सभागृहात देखील काहीतरी गदारोळ झालेला आहे.” असा आरोप छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अधिवेशनात केला. त्यांच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उत्तर देत असताना विरोधकांनी विरोध केला. या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी नाही तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली. सभागृहात मुख्यमंत्री उपस्थित असताना उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायची गरज नाही. असं विरोधकांकडून बोलण्यात आलं. (Widhansabha Winter Session Nagpur Maharashtra live)
“मी आपल्या प्रश्नावर उत्तर द्यायला सक्षम आहे. मी वरच्या सभागृहात देखील याबद्दल स्पष्ट केलं आहे. यावर मुख्यमंत्री देखील उत्तर द्यायला तयार आहेत ते उत्तर देतीलच. पण आपण केलेल्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं एवढ्या लायकीचाच आपला प्रश्न नाहीये. आम्ही भूखंडाचा श्रीखंड खाणारे नाही आहोत. ८३ कोटी वगैरे हवेतले आकडे आहेत.” असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिले. (devendra fadanvis in winter session nagpur maharashtra live)
“मुख्यमंत्र्यांवर अन्याय करू नका” नाना पाटोले
“मुख्यमंत्र्यांच्या समोरचा माईक खेचून तुम्ही त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांना बोलू द्या. मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित असताना उपमुख्यमंत्री यांनी उत्तर देण्याची गरज नाहीये. मुख्यमंत्री उत्तर द्यायला सक्षम आहेत. त्यांना बोलू द्या. त्यांच्या समोरचा माईक खेचून त्यांच्यावर अन्याय करू नका.” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. दरम्यान, या आरोपावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी सभागृहात मोठा गोंधळ उडाला होता.