मुंबई : ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री कुब्रा सैत हिने खळबळजनक खुलासा केला आहे. कुब्राने वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक किस्से ओपन बुक या पुस्तकामध्ये लिहले आहेत. या पुस्तकातून तिने स्वता:वर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितल आहे. कुब्राही सोशल मीडियावर आपल्या हटके अंदाजामुळे चांगलीच चर्चेत असते. तसचं ती वेगवेगळ्या विषयांवर मीडियावरून मतं देखील मांडत असते.
याचबरोबर आपल्या हटके लूकमधील फोटो आणि व्हिडीओ देखील कुब्रा सोशल मीडियावर शेअर करते. कुब्रानं लिहिलेल्या ‘ओपन बुक’ या पुस्तकामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देण्यात आली आहे. कुब्रानं पुस्तकामध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाची माहिती दिली आहे. तिने पुस्तकात लिहिलं आहे की, माझ्यावर 17 वर्षांची असताना लैंगिक शोषण झालं होतं. त्याबद्दल मी माझ्या आईला देखील सांगितलं नव्हत.
दरम्यान, कुब्रानं सांगितल की, बंगळुरूमधील एका हॉटेसमध्ये ती आणि तिचे कुटुंब दररोज जायचं. त्या हॉटेलच्या मालकाची ओळख तिच्या कुटुंबासोबत झाली. त्याकाळात आर्थिक संकटातही त्या हॉटेलच्या मालकानं कुब्राच्या आईची मदत केली होती. त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी तिच्या आईने त्या व्यक्तीचे पैसे परत देण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिची सुटका झाली असल्याचं तिने सांगितल आहे. तसचं तिने “कुब्रा लाइफ इस नॉटअ फेयरीटेल” नावाचे पुस्तक देखील लिहले आहे.