‘संभाजीराजे’ यांची राज्यसभेच्या लढतीतून माघार? दिल्ली होणार दूर!

कोल्हापुर : (shivsena) शिवसेनेनं कोल्हापुरातून जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देत मोठी खेळी केली. आता या प्रकरणातील मोठी माहिती समोर आली आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) राज्यसभेच्या शर्यतीतून माघार घेण्याची दाट शक्यता वाढली आहे. सकाळीच त्यांनी ट्वीट करत माझी बांधिलकी जनतेशी असल्याची पोस्ट केली. यानंतर चर्चा उधान आले आहे. मविआच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यानं त्यांच्यावर ही वेळ ओढावल्याची संभाजीराजे यांच्या समर्थाकांमध्ये चर्चा आहे. त्यातच भाजपनं देखील त्यांना जाहीर समर्थन दिलेलं नव्हतं. त्यामुळं दिल्लीसाठी आकड्यांची समीकरणं जुळवताना संभाजीराजेंना कसरत करावी लागली आहे.

दरम्यान, येत्या जुलै महिन्यात मराहाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून छत्रपती संभाजीराजे यांची टर्म संपली आहे. आता स्वराज्य नावाच्या संघटनेमार्फत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत राज्यातील सर्व आमदारांना पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं.

राष्ट्रवादीनंही सुरुवातीच्या काळात छत्रपतींना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं. मात्र, यावरून यूटर्न घेत शिवसेनेला पाठिंबा दिला. सेनेनं छत्रपतींना शिवबंधन बांधण्याची ऑफर दिली होती. मात्र राजेंनी ती धुडकावल्याने राज्यसभेचा मार्ग त्यांच्यासाठी अवघड झाला. अखेर सेनेने कोल्हापुरातूनच जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देत खेळी केली.

Prakash Harale: