मुंबई : मुंबईतील दहिसर (Dahisar, Mumbai) मध्ये अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade Recruitment) भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवार आक्रमक झाल्या आहेत. भरतीसाठी पात्र असताना देखील अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप महिलांकडून करण्यात येत आहे. (Mumbai Fire Brigade women recruitment, Dahisar) भरती प्रक्रियेत पात्र होण्यासाठी 162 सेंटीमीटर उंची आवश्यक असते तेवढी उंची असताना देखील अपात्र ठरवण्यात येत असल्याचा आरोप महिलांकडून करण्यात येत आहे. महिला आक्रमक झाल्या आहेत. प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जात आहे. भरतीप्रक्रिया परत घ्या अशी मागणी या महिला करत आहेत. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी महिलांवर लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. (Women candidates Aggressive in Mumbai fire brigade recruitment Dahisar)
दहिसरमध्ये (Dahisar, Mumbai) मागील काही दिवसापासून टप्प्याटप्प्याने भरतीप्रक्रीया सुरू आहे. भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने घेण्यात येत असल्याचा याआधीही उमेदवारांकडून आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून महिलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. (Mumbai Fire Brigade women recruitment Dahisar)
भरतीसाठी जास्त उमेदवार आले असून तेवढ्या जागा अग्निशमन दलात नसल्याने गोंधळ होत असल्याचाही आरोप केला जात आहे. या प्रकरणात मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन प्रशासन काय भूमिका घेईल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.