महिला आयोगाचा; थेट पोलीस महासंचालकांच्या रिपोर्टवरचं आक्षेप!

नवी दिल्ली : (National Women Commission objects to Maharashtra DGP report) प्रसिध्द अभिनेत्री केतकी चितळे हिच्या एका वादग्रस्त वक्तव्यावरुन बराच वादांग झाला होता. त्यानंतर तिच्या अटकेबाबत राष्ट्रीय महिला आयोगानं महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना समन्स पाठवलं होतं. यावर आयोगाला रिपोर्ट प्राप्त झाला असून या रिपोर्टवर आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या रिपोर्टवर थे्ट आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, शर्मा तेवढ्यावरच थांबल्या नसून, त्यांनी मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, समन्सनंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी आम्हाला कारवाईचा रिपोर्ट पाठवला आहे. पण या रिपोर्टमध्ये अनेक विसंगती असून हा अदखलपात्र गुन्हा आहे. केतकीला कोर्टाच्या योग्य परवानगीशिवाय अटक करण्यात आल्याचं दिसून येत आहे.

केतकी चितळेला अटक केल्याप्रकरणी आयोगानं महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना समन्स बाजवलं होतं. त्यानुसार सात दिवसात या समन्सला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. केतकी चितळेनं १५ मे रोजी फेसबुकवरुन राष्ट्रवादी काँग्रेसेचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली होती.

Prakash Harale: