मुंबई : (Women’s Premier League 2023) महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (RCB vs DC) 60 धावांनी मोठा विजय मिळवला आहे.
मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने आधी स्फोटक फलंदाजीचं दर्शन घडवत तब्बल 223 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. यावेळी दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग आणि सलामीवीर शेफाली यांनी दीडशेहून अधिक धावांची विक्रमी भागिदारी केली.
त्यानंतर 120 चेंडूत 224 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या आरसीबी संघाला हे मोठं लक्ष्य पार करता आलं नाही. कोणतीच खेळाडू अर्धशतकही झळकावू शकली नाही. ज्यामुळे संपूर्ण संघ 163 धावाच 20 षटकांत 8 गड्यांच्या बदल्यात करु शकला आणि सामना 60 धावांनी दिल्लीने जिंकला.