World Cup 2023 Team India Squad Announcement BCCI : एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेला आवघा एक महिना बाकी शिल्लक राहिला आहे. त्यापुर्वी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली असून, या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्यामुळे येथेच 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी हे वर्ष मोठी पर्वणी मानले जात आहे.
एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांचा फलंदाज म्हणून समावेश केला आहे. लोकेश राहुल आणि इशान किशन यांचा संघात 2 यष्टीरक्षक म्हणून संघात आहे. रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या खांद्यावर असणार आहे. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवाचा संघात समावेश केला आहे.
आशिया कप मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर श्रीलंकेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची बैठक झाली, ज्यामध्ये वर्ल्ड कप खेळण्यासाठी 15 खेळाडूंना अंतिम रूप देण्यात आले. आशिया कप मध्ये भारतीय संघात स्थान मिळालेले प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा आणि राखीव खेळाडू म्हणून निवड झालेल्या संजू सॅमसनला संघात स्थान मिळणार नाही.