मुंबई : (WPL 2023 final Delhi Capitals vs Mumbai Indians) महिला प्रीमियर लीग २०२३चा प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. रविवारी लीगला पहिला चॅम्पियन मिळेल. या विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमनेसामने असतील.
या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील ८ पैकी ६-६ सामने जिंकले. दिल्लीचा नेट रनरेट चांगला होता आणि त्यामुळेच त्यांना थेट फायनलमध्ये प्रवेश मिळाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
हे दोन्ही संघ साखळी फेरीत दोनदा आमनेसामने आले आहेत. प्रथमच दोन्ही संघ ९ मार्चला आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबईने ९ गडी राखून विजय मिळवला. आणि २० मार्च रोजी दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले आणि यावेळी दिल्ली कॅपिटल्सने ९ गडी राखून विजय मिळवला.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामना रविवार २६ मार्चला संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळल्या जाईल. या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनलवर दाखवले जाणार आहे.