मंदिरा बेदीच्या ‘सलामी’ने WPL उद्घाटन सोहळ्याची ऐतिहासिक सुरुवात

WPL 2023 MI vs GG LIVE : भारतीय महिला क्रिकेटचेच नाही तर जागतिक महिला क्रिकेटचे भविष्य उज्वल करण्यारी वुमन्स प्रीमियर लीग (Women’s Premier League) आजपासून सुरू होत आहे. बीसीसीआयसाठी महत्वकांक्षी असलेल्या या WPL2023 लीगचा पहिला हंगाम हा गुजरात जायंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्याने सुरू होणार आहे.

वुमन्स प्रीमियर लीगचा हंगाम जोरदार करण्यासाठी बॉलीवूड तारका कियारा अडवाणी आणि कृती सनोन उद्घाटन सोहळ्यात आपली कला सादर करतील. याचबरोबर गायक एपी ढिल्लो देखील धमाल करणार आहे.

WPL लीगमध्ये भारतीय युवा मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज महिला क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंगरूम शेअर करण्याचा त्यांच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी मिळणार आहे. यामुळे भारतीय महिला क्रिकेटचा विकास होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

Prakash Harale: