क्रिकेटप्रेमींची नवीन ‘इंटरनॅशनल क्रश’, WPLच्या पहिल्याच मॅचमध्ये ‘या’ खेळाडूवर खिळल्या नजरा!

WPL Who is Amelia Kerr : महिला प्रीमियर लीगच्या (Womens Premier League) पहिल्या हंगामाला शानदार सुरुवात झाली आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात जायंट्स (Gujrat Giants) विरुद्धचा पहिला सामना जिंकला. या सामन्यात खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. दरम्यान जेवढी चर्चा सध्या WPL ची आहे, त्याहूनही अधिक चर्चा एका महिला खेळाडूच्या सौंदर्याची आहे. भारतीय चाहत्यांना नवीन इंटरनॅशनल क्रश मिळाली आहे. सध्या WPL मधील न्यूझीलंडच्या खेळाडूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

WPl च्या पहिल्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात एका आंतरराष्ट्रीय खेळाडूनं भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने गुजरात जायंट्स (Gujrat Giants) संघावर 143 धावांचा दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यात अनेक खेळाडूंनी तुफान खेळी केली. यादरम्यान क्रिकेट फॅन्समध्ये मुंबईच्या संघातून खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूची चर्चा आहे. क्रिकेट चाहत्यांना त्यांची नवी क्रश मिळाली आहे.

सध्या सोशल मीडियावर महिला क्रिकेटपटू अमेलिया केर (Amelia Kerr) ही ची खूप चर्चा आहे. तिच्या निरागस सौंदर्यानं अनेकांना भुरळ घातली आहे. WPL मुळे क्रिकेटप्रेमींना त्यांची नवीन क्रश सापडली आहे. मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू अमेलिया केर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. 22 वर्षांची अमेलिया ही न्यूझीलंडची क्रिकेटपटू आहे. अमेलियाने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती. अमेलिया केर महिलांच्या क्रिकेट संघातील ऑल राऊंडर खेळाडूंपैकी एक आहे.

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या सामन्याआधीच अमेलिया केरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. WPL आधी अमेलियाच्या मुलाखतींमुळे ती चर्चेत आली. यामुळे चाहत्यांची नजर अमेलियावर पडली आणि तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनावर छाप पडली आहे. सोशल मीडियावर अमेलियाचे फोटो प्रचंड चर्चेत असून नेटकऱ्यांनी तिला ‘नवीन इंटरनॅशनल क्रश’ म्हटलं आहे.

Prakash Harale: