कुस्तीपटूंना क्रिकेटर्सचा सपोर्ट नाही, विनशे फोगाटनं व्यक्त केली नाराजी; म्हणाली, “आमची एवढी लायकी…”

नवी दिल्ली | Wrestlers Protest – सध्या देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच त्यांना अनेक राजकीय पक्ष आणि कलाकारांकडूनं सपोर्ट मिळत आहे. मात्र, यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ कोणताही क्रिकेटर पुढे आलेला नाहीये. त्यामुळे कुस्तीपटू विनेश भोगाटनं (Vinesh Phogat) नाराजी व्यक्त केली आहे.

विनेश भोगाट म्हणाली की, “आपल्या देशात अनेक महान खेळाडू आहेत. त्यात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी अमेरिकेतील ब्लॅक लाइव्हस मॅटर चळवळीला पाठिंबा दर्शवला होता. मग आमची एवढी देखील लायकी नाही का?”, असा सवाल विनेशनं उपस्थित केला आहे.

“जेव्हा कुस्तीपटू जिंकतात त्यावेळी त्यांचं सर्व क्रिकेटपटू अभिनंदन करण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी ट्विट करतात. मग आता काय झालं? या खेळाडूंना व्यवस्थेची इतकी भीती वाटते की, काही तरी गडबड सुरू आहे?”, असंही विनेश भोगाट म्हणाली.

Sumitra nalawade: