भारतात ‘या’ सेलिब्रिटींना पुन्हा मिळाली ब्लू टिक!

Blue Tick : आठवड्यापूर्वी ट्विटरच्या नव्या नियमांमुळे ब्लू टिकसाठी पैसे देऊन ट्विटरचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार होतं. त्यामुळे कितीतरी महत्त्वाच्या व्यक्तींच्या ट्विटरवरुन ब्लू टिक गायब झाली देखील झाली होती. भारतातही कितीतरी सेलिब्रिटींची ब्लू टिक आज गायब झाली आहे. मात्र आजची सकाळ, रविवारची सकाळ अनेक युझर्ससाठी हैराण करणारी होती. आज 23 एप्रिल रोजी त्यातील काही युझर्सचे ब्लू टिक ट्विटरने पुन्हा बहाल केले, तेही कोणताही मोबदला न घेता. या युझर्सने त्यासाठी सब्सक्रिप्शन घेतले नव्हते की एलॉन मस्क महाशयांना कसली ही विनंती पण केली नव्हती. पण हा चमत्कार झाला. ट्विटरने छदाम ही न घेता ब्लू टिक परत केली. मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि खेळाडूंना त्यांचे ब्लू टिक परत केले. हा जागतिक स्तरावरील मोठी माणसं आहेत. या नावाजलेल्या व्यक्तींना ब्लू टिक परत करण्यात आली.

काय आहे अट?

या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने जगातील नावाजलेल्या व्यक्तींना त्यांचे ब्लू टिक परत केले. पण त्यासाठी एक अट कायम केली. ज्या सेलिब्रिटींचे 1 मिलियन म्हणजे 10 लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. त्यांना ब्लू टिक परत करण्यात आली. त्यांच्या अकाऊंटला ही ब्लू स्टिक री-स्टोअर करण्यात आली. त्यासाठी या सेलिब्रिटींच्या खिशाला कोणतीही झळ बसलेली नाही.

भारतात या सेलिब्रिटींना पुन्हा मिळाली ब्लू टिक

रविवारी, सचिन तेंडूलकर, शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि महेंद्र सिंह धोनी आणि इतर अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या ट्विटर खात्यात ब्लू स्टिक परत मिळाले. यामध्ये Kobe Bryant, Chadwick Boseman आणि सुशांत सिंह राजपूत यासारख्या खात्यांना पण 10 लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स असल्याने ब्लू स्टिक परत री स्टोअर करण्यात आली. हे तीनही स्टार सध्या जगात नाहीत.

Dnyaneshwar: