येस बॅंकेच्या संस्थापकाचा प्रियांका गांधीवर गंभीर आरोप…

मुंबई : येस बॅंकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी काॅंग्रेसच्या प्रियांका गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी चौकशीत अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सांगितले की, काँग्रेसच्या प्रियांका गांधी वड्रा यांच्याकडून ‘एमएफ हुसेन पेंटिंग’ विकत घेण्यास माझ्यावर बळजबरी करण्यात आली. त्या विक्रीतून मिळालेली रक्कम गांधी कुटुंबाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये वापरली. २ कोटींचा धनादेश हा सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरला गेला असं देवरा यांनी आपल्याला सांगितल्याचं असं, त्यांनी फेडरल अँटी मनी लाँडरिंग एजन्सीने येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी एमएफ हुसेन पेंटिंग विकत घेण्यास नकार दिला तर केवळ गांधी घराण्याशी संबंध निर्माण करण्यापासून रोखले जाणार नाही तर ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळण्यापासून देखील रोखले जाईल. असा इशारा आपल्याला दिला असल्याचं कपूर यांनी ईडीला सांगितलं. मनी लॉंड्रिंग प्रकरणी राणा कपूर आणि त्यांचे कुटुंबिय, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रवर्तक कपिल आणि धिरज वाधवान यांच्याविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी राणा कपूर यांनी ईडीला बोलताना हे विधान केले आहे.

Prakash Harale: