‘…तुमच्या आणि आईच्या पार्टनरशिपला तोड नाही’; प्रिया बापटची आई-वडिलांसाठी भावूक पोस्ट

मुंबई : मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट ही नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तसंच प्रिया ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती अनेकदा तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तसंच नुकतंच प्रिया बापटने तिच्या आई वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या आई-वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने तिचा जुना फॅमिली फोटोही पोस्ट केला आहे. यासोबतच तिने या पोस्टला हटके कॅप्शन देखील दिलं आहे.

“प्रिय आई – बाबा, बाबा, वडील म्हणून, मुलगा म्हणून तुम्ही बेस्ट आहातच आणि कायम असाल. पण, तुमच्या आणि आईच्या ३८ वर्षांच्या संसारात तुम्ही सर्वांत बेस्ट होतात. आर्थिक बाजू तर तुम्ही सांभाळलीच पण सांसारिक सर्व जबाबदार्यांमधे तुमच्या आणि आईच्या पार्टनरशिपला तोड नाही.

मुलांचे लाडही दोघांनीही केले आणि आोरडाही दोघांनीही दिला. शाबासकी, कौतुक दोघांनी केलं. अगदी आई घरी नसताना स्वयंपाकाही केलात आणि कधीही अवलंबून न राहण्याची शिकवण दिलीत. आर्थिक अडचण आोढवल्यावर मॅट्रीकही न झालेली आईने घराबाहेर पडून तुमच्या बरोबरीने काम करून आर्थिक जबाबदारी पार पाडली. एरवी नाजूक तब्बेतीची आई तुम्हाला जरा बरं नाहीसं झालं तर सगळं बळ एकवटून झाशीची राणी व्हायची. आणि आईसाठी तुम्ही जे गेली ३ वर्ष केलत, तिची सेवा, प्रेम ते क्वचितच कोणी नवरा आपल्या बायकोसाठी करत असेल. इतकं निस्वार्थ प्रेम.

तुम्हा दोघाची मुलं म्हणून श्वेता आणि मी जन्माला आलो, तुमच्यासारख्या आई वडिलांची सेवा करता येणं हेच आमच्या जन्माचं सार्थक आहे. आईची कमतरता कायमच जाणवेल. आज तुमच्या वाढदिवशी Mother’s Day आहे म्हणून दोन्ही शुभेच्छा तुम्हालाच. आईकडे आता जादूची कांडी आहे, तुमच्या कडे आशिर्वाद आहेत. ते दोन्ही आमच्या पाठीशी असू देत. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो.” असं प्रिया बापटने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Sumitra nalawade: