युवा फुटबॉल स्पर्धा २ ऑक्टोबरपासून

पुणे : हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या वतीने सलग सहाव्या अपोलो हॉटफुट युवा साखळी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या आंतरफुटबॉल अ‍ॅकॅडमी स्पर्धेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील विविध वयोगटातील ६४ संघ सहभागी झाले आहेत.

ही स्पर्धा रविवार, दि. २ आॅक्टोबर २०२२पासून हॉटफुट अ‍ॅकॅडमीच्या बावधन येथील मैदानावर होणार आहेत. हॉटफुट अ‍ॅकॅडमीतर्फे ही स्पर्धा ८, १०, १२ आणि १४ वर्ष वयोगटामध्ये खेळवण्यात येणार आहे. लहान वयोगटात स्पर्धा खेळवण्याची संधी मिळावी व फुटबॉलची रुची निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेर्च आयोजन करण्यात येत असल्याचे स्पर्धेचे संचालक अ‍ॅश्ले ब्रिगॅन्झा यांनी सांगितले.

साखळी पद्धतीमध्ये होणारी ही स्पर्धा दर रविवारी होणार आहे. स्पर्धेच्या ८, १०, १२ आणि १४ वर्ष या प्रत्येक वयोगटामध्ये १६ संघ सहभागी झाले आहेत. ८ आणि १० वर्षांखालील स्पर्धा ६-अ-साईड, १२ वर्षांखालील ८-अ-साईड आणि १४ वर्षांखालील स्पर्धा ९-अ-साईड या पद्धतीने होणार आहे.

स्पर्धेतील ८, १०, १२ आणि १४ वर्षे वयोगटातील विजेत्या आणि उपविजेत्या संघ आणि खेळाडूंना करंडक आणि पदक मिळणार आहे. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, सर्वाधिक गोल स्कोअरर अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात
येणार आहेत.


Prakash Harale: