शरद पवारांवर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाची रवानगी थेट जेलमध्ये; केले होते हे ट्विट…

मुंबई : गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.तसंच या ट्विटचा स्क्रिनशॉट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शेयर केला होता. त्यामध्ये त्यांनी या सर्व प्रकारची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता त्या तरुणाला पकडण्यात आले असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तर या तरुणाच्या मोबाईलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आढळून आला आहे.

तसंच जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. यामध्ये निखिल भामरे नावाचा एक तरुण बागलाणकर या युजरनेमचा वापर करून असं आक्षेपार्ह ट्विट करत होता. तर त्यानं थेट शरद पवार यांच्यावर ट्विट केलं होत. त्याने या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, “वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. “बाराचाकाका माफी_माग.” यावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, निखिल भामरे याला शरद पवारांविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण दिंडोरी पोलिसांनी कारवाई केली आहे. तसंच राजकारणासाठी तरुण विद्यार्थीनी आपल्या अंगावर केसेस घेऊ नयेत असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

Nilam: