मुंबई : (Zilla Parishad recruitment process cancelled) जिल्हा परिषदांच्या पार पडलेल्या 13514 पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याकडून घेण्यात आला आहे. अर्जदारांच्या तपशीलामधील काही त्रुटी असल्याचे सांगण्यात आलं आहे, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामविकास खात्याकडून गट क पदासाठी 13 हजार 514 जागेवर भरती प्रक्रिया मार्च 2019 मध्ये जाहीर करण्यात आली होती. तेव्हापासून वेगवेगळ्या कारणांमुळे ही भारती प्रक्रिया पुढे जात होती. सुरवातीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचार संहिता जाहीर झाली. त्यानंतर कोरोना संकट समोर आलं त्यानंतर ACBC च्या आरक्षणाचा घोळ झाला होता. या वेगवेगळ्या कारणांमुळे ही भरती प्रक्रिया पुढे-पुढे ढकलण्यात आली त्यामुळे या भरतीसाठी परिक्षार्थींना जवळपास 4 वर्षे वाट पहावी लागली.
परिक्षासाठीचे फार्म भरुन घेण्यात आले मात्र, परिक्षा काही झाली. भरती डेटा गहाळ झाल्याचे कारण देत आता ग्रामविकास खात्याने परीक्षा रद्द केल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क परत देण्याचे सांगण्यात आले आहे. पण किती उमेदवारांना पैसे परत मिळणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.