कापराचे फायदे…

पुजेच्या तबकात तुम्ही कापराचा वापर अनेकदा केला असेलच. पण कापराचा केवळ देवापुढे दिवा लावण्यासाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी कारणासाठीही केला जातो. अनेक प्रभावी औषधांमध्ये कापूर वापरला जातो. पण हा कापूर शुद्ध नैसर्गिक आहे… भीमसेन कापूर… हा पाण्यात टाकल्यास तरंगत नाही. आकार वेडावाकडा असतो, गोल नसतो, पारदर्शक आहे… तेव्हा बघू या याचे फायदे :

१) जर तुम्हाला कुठे जखम झाली तर किंवा कापलं गेलं तर, कापरामध्ये पाणी घालून हे पाणी तिथं लावावे. खूप लवकर जखम भरून येते. कारण कापरात अॅंटिबायोटिक आहे.
२) सर्दी बरी होत नसेल तर, एका रूमालात कापूर घेऊन यांचा वास घेत राहावे, शिंका येणं, पाणी येणं थांबते, तसेच खोकल्याची उबळ थांबत नसेल तर, कापूर पावडर व ज्येष्ठमध एकत्र करून खावे. याने खोकला बरा होतो.
३) कांजिण्या, गोवर येऊन गेल्यावर तिथे आग होते, त्वचा भाजल्यासारखी वाटते, तेव्हा शुद्ध खोबरेल तेलात कापूर पावडर टाका आणि हे तेल तिथे काही दिवस लावा. याने थंडावा तयार होतो.
४) केस गळत असेल तर, कोंडा कमी होत नसेल तर, शुद्ध खोबरेल तेलात कापूर पावडर टाका आणि हे तेल केसांना चोळून लावावे, सगळे त्रास बंद होतात.
५) उन्हाळ्यात नाकातून रक्त येणे, घोळणा फुटतो, अशा वेळी गुलाब पाण्यात कापूर उगाळून यांचे दोन थेंब नाकात टाकावे. त्वरित आराम मिळतो.
६) बरेच वेळा जीव घाबरतो, छातीत धडधड होते, अशा वेळी कापराचा लहान तुकडा चघळावा, याने नाडी जलद होते व बरं वाटतं.

७) विंचू चावला तर कापूर व्हिनेगरमध्ये उगाळून लेप लावावा. विंचवाचे विष उतरते.
८) पोट बिघडले तर, पोटाला गुब्बारा आला तर व असह्य वेदना होत असेल तर, पुदिना सरबतात कापूर पावडर टाका आणि हे प्यावे. त्वरित आराम मिळतो.
९) खाज, खरुज, नायटा, रिंगवर्म, गजकर्ण या सर्व त्वचाविकारांवर कापूर पावडर चमेली तेलात मिसळून व काही लिंबाचा रस टाकून हे संक्रमण असलेल्या जागेवर लावावे. हळूहळू रोग बरा होतो.
१०) सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी. सर्व प्रकारच्या वातरोगावर तिळाच्या तेलात कापूर पावडर टाकून याने मालिश करा. तिथल्या वेदना जातात व सूजही ओसरते. ११) दाढ किडली असेल तर, दात दुखत असल्यास कापराचा तुकडा तिथे ठेवा. वेदना कमी होतात व किडही मरते. १२) न्यूमोनिया, टायफाॅईड, या आजारांमध्ये कापूर पावडर ही टरपेंटाईन तेलात मिसळून हे तेल सकाळ-संध्याकाळ छातीला चोळावे. याने कफ सुटतो. बाहेर पडतो. आराम पडतो.
१३) डिप्रेशन आलं असेल तर, कापूर पावडर शुद्ध खोबरेल तेलात मिसळून हे कपाळावर लावा. याने
नसा मोकळ्या होतात. स्ट्रेस जातो. मन शांत होते. कारण याचा वास खूप सुखद आहे. १४) पायांना भेगा पडल्या असतील तर गरम पाण्यात कापूर पावडर टाका आणि पाय बुडवून ठेवावे.

Nilam: