मुंबई | Bigg Boss Marathi 4 – यंदा ‘बिग बाॅस मराठी’चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) चांगलंच गाजलं आहे. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकानं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, आता लवकरच हे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 8 जानेवारीला बिग बाॅस मराठीचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. अशातच आता बिग बाॅसला त्यांचे टाॅप 5 (Top 5) स्पर्धक मिळाले आहेत.
बिग बॉसच्या घराला टॉप 5 सदस्य मिळाले आहेत. यामध्ये अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अक्षय केळकर, अमृता धोंगडे आणि राखी सावंत या स्पर्धकांचा समावेश आहे. तसंच टिकीट टू फिनालेचा टास्क जिंकत अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची पहिली फायनलिस्ट ठरली आहे. या दरम्यान, अपूर्वाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अपूर्वाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा लाल रंगाच्या साडीतील एक फोटो शेअर करण्यात आला आहे. तसंच या फोटोला “लाल रंगाची साडी नेसणाऱ्यांनाच माहीत आहे त्यांच्याकडे किती शक्ती असते. कोणीही यावं कोणीही जावं शेवटी मीच जिंकावं”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. त्यामुळे अपूर्वाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
दरम्यान, बिग बाॅस मराठीचं हे चौथं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 8 जानेवारीला बिग बाॅस मराठीचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. अशातच आता बिग बाॅसला त्यांचे टाॅप 5 (Top 5) स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.