सदानंद सुळेंनी ‘स्त्रीद्वेषी’ म्हटल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : Chandrakant Patil on Sadanand Sule | भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Pati) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनी संताप व्यक्त करत चंद्रकांत पाटलांना स्त्रीद्वेषी म्हटलं होतं. या सर्व प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी संताप व्यक्त करत चंद्रकांत पाटलांना स्त्रीद्वेषी म्हटलं होतं. यामुळे आज चंद्रकातं पाटील यांनी उत्तर दिलं आहे. Chandrakant Patil on Sadanand Sule

सदानंद सुळेंनी (Sadanand Sule) म्हणले कि, “हे आहेत महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि हे सुप्रिया सुळेंबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होतं हे स्त्रीद्वेषी आहेत, जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे, ती गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे.याबरोबर देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय,” अशा शब्दांत सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनी संताप व्यक्त केला आहे.त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी(Chandrakant Pati) प्रत्युत्तर देत म्हंटल की,“सुप्रिया सुळेच (Sadanand Sule) नाही तर कोणत्याही महिलेला मी आदर देत असतो. मग ती महिला माझ्या पक्षातली असो किंवा इतर पक्षातली. त्यामुळे सदानंदजी ग्रामीण भागात थोडं राहायला शिका. पोरालाही आई मसणात जा असं म्हणते. याचा अर्थ त्याला स्मशानभूमीत जा असा होतं नाही.अशा शब्दात पाटलांनी प्रत्युत्तर दिल आहे.

दरम्यान, “स्त्रीद्वेषी असण्याचा काय विषय आहे. आपण स्वयंपाकाचा विषय काढून टाकू, मी फक्त घऱी जा म्हटलं होतं. त्यामुळे सदानंदजी तुमच्या पत्नीचाच नाही तर कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा माझा स्वभाव नाही,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच त्यांनी यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टिकेबद्दल सांगितलं कि,मी ओबीसी समाजाला न्याय मिळावा यामुळे सात्विक संताप व्यक्त केला होता . यामुळे तुम्ही त्याच राजकारण करायची गरज नाही.

Nilam: