एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंसह शिंदेंवर टीका; म्हणाले, “दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे…”

जळगाव | Eknath Khadse On Uddhav Thackeray And Eknath Shinde – शनिवारी (8 ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगानं रात्री उशिरा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वादावर शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचे निर्देश दिले. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून पक्ष दुभंगला आहे, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले. ते जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले, “शिवसेनेची सद्यस्थिती पाहता उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेंनी काय केलं? यावरून दोष देण्यात काहीही अर्थ नाही. पक्षप्रमुख म्हणून चुका होत राहतात. काही चुका या उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाल्या असतील. मात्र, एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्ष संपवून टाकावा. आता तेही संपले आणि तुम्हीही संपले, अशी स्थिती निर्माण होता कामा नये.”

दरम्यान, शिंदे गटानं निवडणूक आयोगाला सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानंदेखील दिला आहे. त्यामुळे शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Sumitra nalawade: