ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

चिन्ह गोठवले! उद्धव ठाकरेंनी दंड थोपटले, आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव!

नवी दिल्ली : (Uddhav Thackeray in the Delhi High Court against the decision of the Election Commission) शनिवार दि. 8 ऑक्टोंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने रात्री उशिरा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वादावर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचे निर्देश दिले. त्यानंतर रविवारी दिवसभर राजकीय वर्तूळातून वेगवेगळ्या प्रतिकिया उमटताना दिसल्या. हा आयोगाचा निर्णय शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा होता. राज्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी टाहो फोडत हंबरडा केला आणि आपल्या मनातील दुःख व्यक्त केलं.

दरम्यान, आज त्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवलं या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केला आहे. या याचिकेतून आयोगाच्या निर्णयावर दाद मागण्यात येणार आहे. आम्हाला बाजू मांडण्याची निवडणूक आयोगाकडून संधी देण्यात आली नसून चिन्ह का गोठवलं गेलं आहे, याचे ठोस स्पष्टीकरण देखील देण्यात आलं नसल्याचे त्यांनी नमूद केलं आहे.

आम्ही दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नवा गोठवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने आपल्या याचिकेत केली आहे. तसेच ही याचिका आजच तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर दिल्ली उच्च न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Articles

9 Comments

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये