उद्योजक हिम्मत आसबे ब्राझील अभ्यास दौऱ्यावर
देशभरातील प्रमुख साखर कारखानदार, उद्योजक, अभ्यासक यांच्या शिष्टमंडळातून पंढरपूरचे सुपुत्र, उद्योजक हिम्मत आसबे यांची ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून हे शिष्टमंडळ ब्राझील वर रवाना झाले.
पुणे : देशभरातील प्रमुख साखर कारखानदार, उद्योजक, अभ्यासक यांच्या शिष्टमंडळातून पंढरपूरचे सुपुत्र, उद्योजक हिम्मत आसबे यांची ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून हे शिष्टमंडळ ब्राझील वर रवाना झाले. भारतात ज्याप्रमाणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यरत आहे त्याप्रमाणे ब्राझीलमध्ये सीटीसी ही संस्था संशोधन क्षेत्रात काम करते या संस्थेला आज या शिष्टमंडळाने भेट दिली.
नॅशनल फेडरेशनचे केतन भाई पटेल, प्रकाश नाईक नवरे, श्री छत्रपती शाहू सहकारी चे समरजीत सिंह घाडगे पाटील, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे चेअरमन विवेक कोल्हे, राजारामबापू कारखान्याचे प्रतीक जयंतराव पाटील, श्री रणवरे अशा सुमारे 28 मान्यवरांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे.
दैनिक राष्ट्रसंचारशी बोलताना आसबे यांनी सांगितले की, CTC ही ब्राझील मधील ऊस संशोधन करणारी संस्था असून अतिशय उच्च दर्जाचे संशोधन येथे केले जाते. मातीचा अभ्यास, पिकाला मिळणारा पाण्याच्या अभ्यास, वेगवेगळ्या उसाच्या जाती व सीड्स येथे तयार करून त्यावर संशोधन केले जाते. वेगवेगळ्या हवामानात व अनेक प्रकारच्या माती मध्ये कुठ्याल्या प्रकारचे सीडस पासून अधिक व दर्जेदार उत्पादन होईल हे तपासले जाते.
ही संस्था दक्षिण ब्राझील मधील पीरासा काबा येथे असून याच ठिकाणी ब्राझील मधील 40 % साखर कारखाने आहेत. या शिष्टमंडळाने आज भारतीय राजदूताला भेट देऊन मनीषा स्वामी यांच्याशी चर्चा केली. भारतातील साखर उद्योगासमोरील अडचणी, त्याची प्रशासकीय मांडणी, ठेकेदार आणि मध्यस्थांच्या सुसूत्रीकरणाबाबत मी येथे अनेकांशी चर्चा करीत असून त्याचा एक अहवाल शुगर फेडरेशनला सादर करणार असल्याचे आसबे यांनी सांगितले.