ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“आम्ही तयार आहोत अर्ध्या पगारावर काम करायला, पण…”, सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षीत बेरोजगारांचा धडक मोर्चा

कोल्हापूर | Old Pension Scheme – जुन्या पेन्शसाठी (Old Pension Scheme) सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच गदारोळ झाला आहे. अशातच, कोल्हापुरात (Kolhapur) सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षित बेरोजगार तरूण-तरूणींमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या सुशिक्षित बेरोजगारांनी सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे. सध्या या मोर्चाची पोस्ट व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असल्याचं म्हटलं आहे.

व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा! आम्ही तयार आहोत. अर्ध्या पगारावर काम करायला. ते ही विना पेन्शन.. सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींचा भव्य मोर्चा.. जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण मोर्चात सहभागी होऊया.. शुक्रवारी (17 मार्च) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासाठी दसरा चौकात हजर राहावं. मी येतोय.. तुम्हीही या.. याला लागतंय.. असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

pension

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करुन तोडगा काढण्याचं आश्वासन महाराष्ट्र राज्य महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनला दिलं आहे. त्यामुळे आजपासून (16 मार्च) राज्यभरातील महापालिकेतील कर्मचारी राज्यव्यापी संपातून बाहेर पडले आहेत. तसंच कोल्हापूर मनपा कर्मचारी (Kolhapur Municipal Corporation) आज कामावर रुजू होणार आहेत. पण ते काळ्याफिती लावून काम करतील, असं पत्र फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये