ताज्या बातम्या

राज्यात पुण्यासह या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट

पुणे | राज्यातील तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे ढगाळ वातावरण होत आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु त्यात आता गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश याहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. या जिल्ह्यांत आज दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये