ताज्या बातम्यापुणे
सत्ता परिवर्तन सभेत वसंत मोरेंना पुण्यातून विविध समाजातून पाठिंबा
पुणे | डेक्कन येथील झेड ब्रीज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ सत्ता परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षासाठी ३० हजार रुपयांची पक्षनिधी ‘वंचित’चे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच ‘तळजाई एकता शक्ती प्रतिष्ठान’चे अध्यक्ष नीलेश खंडाळे यांनी मातंग समाजाचा वंचित पक्षासाठी पाठिंबा असल्याचे जाहीर केले. या सभेत स्वाभिमानी युवक संघाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनीदेखील पाठिंबा जाहीर केला. यावेळी सचिन खंडाळे, सागर कसबे, अभिषेक चांदणे, विशाल गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.