ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

नांदेड सिटीतील सुमारे 12 हजार सदनिकाधारकांना बसणार पालिकेचा फटका

पुणे | Nanded City : नांदेड सिटीतील (Nanded City) सदनिकाधारकांना मोठा फटका बसणार आहे. कारण नांदेड सिटी ही महापालिका हद्दीत आल्यामुळे महापालिकेने तेथील रहिवाशांना मिळकतकराची आकारणी सुरू केली आहे. पण, तेथे राहणाऱ्या संबंधित रहिवाशांना मिळकतकरातील 40 टक्क्यांची सवलत देण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

नांदेड सिटीतील रहिवाशांना महापालिकेनं वाढीव मिळकतकराची देयके पाठविली आहेत. तसंच ही सवलत मिळवण्यासाठी रहिवाशांना आता क्षेत्रीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. तर 30 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्यांनाच ही सवलत दिली जाणार आहे.

महापालिकेच्या करआकारणी विभिगाकडून घरमालकांना मिळकतकरात 40 टक्क्यांची सूट दिली जाते. पण नांदेड सिटीतील रहिवाशांना 3 वर्षांपासून मिळकतकर देयके देताना ही सवलत न देताच देयके पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे आता नांदेड सिटीतील सुमारे 12 हजार रहिवाशांना वाढीव मिळकतकर भरावा लागणार आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये