ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“चोराला चोर म्हणणं हा…”, राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

मुंबई | Uddhav Thackeray – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मानहानीप्रकरणी सुरतमधील जिल्हा न्यायालयानं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवत त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर आज (24 मार्च) राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी जाहीर केला आहे. तसंच ओम बिर्ला यांनी याबाबतचे आदेशही काढले आहेत.

राहुल गांधीवर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर विरोधकांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांची ही प्रतिक्रिया खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केली आहे.

“राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणं हा गुन्हा ठरला आहे. चोर, देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

राहुल गांधींनी कोणत्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा दिली?

कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधीनी मोदींच्या आडनावावरुन टीका केली होती. त्यामुळे राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. तसंच काल (23 मार्च) यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर आता त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला असून त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र फक्त 30 दिवसांसाठी या शिक्षेची अंमलबजावणी स्थगित करण्यात आली. राहुल गांधींना उच्च न्यायालयात जाण्यासाठी कोर्टानं 30 दिवसांचा वेळ दिला आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये